रात्रीचे अनावश्यक जागरण टाळा !

वैद्य मेघराज पराडकर

‘शरिराचे कार्य सुरळीत चालू रहाण्यासाठी जसे योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे, तसे योग्य प्रमाणात झोप घेणेही आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण केले, तर पित्त वाढते. बुद्धीची क्षमता न्यून होते. पचनासंबंधी विकार चालू होतात. शरीर दुबळे आणि कृश होत जाते. झोपेची घडी न बसवता या विकारांसाठी कितीही औषधे घेतली, तरी ‘रात्रीचे जागरण’ हे मूळ कारण जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत औषधांचा फारसा लाभ दिसत नाही. त्यामुळे रात्री उशिरात उशिरा ११ ते ११.३० पर्यंत झोपावे. रात्री उशिरा जागून जे काम करायचे, ते पहाटे ४ किंवा ५ वाजता उठून करावे. कधीतरी जागरण झाले, तर चालू शकते; पण प्रतिदिन रात्रीचे जागरण टाळावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२२)