यवतमाळ, ४ ऑगस्ट (वार्ता.) – येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्या २ तरुणी भाग्यनगरहून यवतमाळला जाण्यासाठी खुराणा ट्रॅव्हल्सने प्रवास करत होत्या. ट्रॅव्हल्सच्या धर्मांध चालकाने पहाटे या तरुणींचा विनयभंग केला. तरुणींनी आरडाओरडा केल्याने चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण सहप्रवाशांनी त्याला पकडले. तरुणींनी त्यांच्या कुटुंबियांना याविषयी आधीच कळवले असल्याने ते यवतमाळ येथे आधीच पोचलेले होते. त्या सर्वांनी धर्मांध वासनांधाला चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. (धर्मांधांला धडा शिकवणार्या तरुणींच्या नातेवाइकांचा स्तुत्य प्रयत्न ! अशी आक्रमकता तरुणींमध्ये निर्माण होण्यासाठी त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – संपादक) पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नाेंद केला.
संपादकीय भूमिकाधर्मांधांची वासनांधता लक्षात घेऊन तरुणींनी सतर्क रहायला हवे ! |