विहिंपच्या विरोधानंतर दुकानाच्या ठिकाणी मांस न खाण्याची आणि नमाजपठण न करण्याची अट !
बिलीमोरा (गुजरात) – येथील सोमनाथ महादेव मंदिराच्या यात्रेमध्ये मुंबईतील अन्वर शेख या मुसलमानाला दुकान आणि मुलांसाठी खेळाची जागा बनवण्यासाठी ४६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. यावर विश्व हिंदु परिषदेने आक्षेप घेत कंत्राट मागे घेण्याची मागणी केली आहे. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या विश्वस्तांच्या कार्यालयात जाऊन चेतावणी दिली आहे, ‘जर हे कंत्राट रहित केले नही, तर आंदोलन करण्यात येईल.’ या संदर्भात विश्वस्तांनी बैठक घेऊन प्रकरण मिटवले आहे. या मंदिरात प्रतिवर्षी यात्रा भरते. यात अनुमाने १० लाख भाविक येतात.
१. विहिंपचे म्हणणे आहे की, एखाद्या मुसलमानाला कंत्राट देऊन यात्रेमध्ये येणार्या हिंदु भाविकांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा धोका आहे. अशा स्थितीत येथे मांस खाण्याची व्यवस्थाही केली जाऊ शकते, तसेच नमाजपठण केले जाऊ शकते.
२. यावर मंदिराचे विश्वस्त शिवा पटेल म्हणाले की, आम्ही कंत्राट रहित करणार नाही. तथापि कंत्राटदाराला ‘मांस खाणार नाही आणि नमाजपठण करणार नाही’, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. पुढच्या वर्षी कंत्राट देतांना आम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ. आम्ही आमची अडचण विहिंपसमोर मांडल्यानंतर त्यांनी कंत्राट कायम ठेवण्याचे मान्य केले आहे.
३. विहिंपचे शहर अध्यक्ष हिरेन शहा म्हणाले की, विहिंपचे पथक ‘या यात्रेत कुठेही आक्षेपार्ह घटना घडणार नाही’, याकडे लक्ष ठेवेल. जर काही अनुचित घडले, तर कारवाई केली जाईल.
संपादकीय भूमिकाहिंदूंना झालेला हा एकतर्फी सर्वधर्मसमभावाचा रोग कधी नष्ट होणार ? ‘उद्या जर कुणी अशा दुकानांच्या आडून यात्रेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला या मंदिराच्या विश्वस्त मंडळालाच उत्तरदायी ठरवावे’, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे ! |