बिहारमधील हाजीपूरनंतर मुंगेर येथेही साधू बनून भीक मागणारे तिघे मुसलमान पोलिसांच्या कह्यात !

हाजीपूर येथे साधुंच्या वेशात पकडण्यात आलेले आरोपी

मुंगेर (बिहार) – बिहारच्या हाजीपूर येथे ६ मुसलमानांना साधूंचा वेश परिधान करून सजवलेल्या बैलासमवेत भीक मागतांना पकडण्यात आले होते. तशाच प्रकारे भीक मागणार्‍या ३ मुसलमानांना मुंगेर येथेही पकडण्यात आले. स्थानिक नागरिकांना त्यांच्याविषयी संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांचे खरे रूप उघडकीस आले. या तिघांपैकी दोघेजण उत्तरप्रदेशमधील बहराइच येथील, तर एक जण अयोध्येतील आहे. दोन्ही घटनांमध्ये या मुसलमानांनी त्यांची हिंदू नावे ठेवली होती.

संपादकीय भूमिका

‘लव्ह जिहाद’साठी ‘हिंदू’ बनणारे धर्मांध आता भीक मागण्यासाठीही ‘हिंदू’ बनत आहेत. या भीकेतून मिळणारा पैसा जिहादी आतंकवादी कारवायांसाठी वापरला जाणार आहे का ?, याचा शोध आता पोलिसांनी घेतला पाहिजे !