कन्नूर (केरळ) येथे संघ स्वयंसेवक जिमनेश यांची माकपच्या गुंडांकडून हत्या !

कन्नूर (केरळ) – येथील कुथुपरम्बा क्षेत्रातील पानुंडा येथे माकपच्या गुंडांनी केलेल्या आक्रमणात गंभीर घायाळ झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जिमनेश यांचा दुसर्‍या दिवशी उपचारांच्या वेळी मृत्यू झाला. माकपच्या कार्यकर्त्यांनी २४ जुलै या दिवशी जिमनेश आणि अन्य काही स्वयंसेवक यांच्यावर आक्रमण केले होते. अन्य स्वयंसेवकांवर थालास्सेरी येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील पिनारयी गावात टी. अक्षय नावाच्या स्वयंसेवकाच्या घरी ‘गुरुदक्षिणा’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम झाल्यावर स्वयंसेवक घरी परतत असतांना माकपच्या गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. यामध्ये जिमनेश यांच्यासह टी. अक्षय, ए. आदर्श, पी.व्ही. जिष्णु आणि के.पी. आदर्श हे घायाळ झाले. उपचारांसाठी रुग्णालयात नेल्यावर जिमनेश खाली कोसळले. ‘अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला’, असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी, ‘जिमनेश यांचा मृत्यू खाली पडून झाला’, असे म्हटले आहे. (माकपच्या राज्यातील पोलिसांकडून दुसरी कोणती अपेक्षा करता येईल ? – संपादक)

  • हिंदुत्वनिष्ठांच्या जिवावर उठलेले माकपवाले ! हिंदूंच्या रक्षणासाठी येथे राष्ट्रपती राजवट लागू करणे अपरिहार्य आहे !
  • बंगाल, केरळ यांसारखी राज्ये हिंदूंसाठी अधिकाधिक असुरक्षित होत चालली आहेत. या स्थितीवर आता हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !