सनातन संस्थेच्या वतीने तेलंगाणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा
भाग्यनगर (तेलंगाणा) – केवळ श्री गुरूंमध्येच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यासारखे दिव्य कार्य करण्याची क्षमता असते. श्री गुरूच आपल्याला सर्वाेच्च ज्ञान प्रदान करू शकतात. हिंदु म्हणून आज आपण गुरुस्थानाचे रक्षण करून त्यांचा सन्मान राखला पाहिजे. काही हिंदुविरोधी शक्ती हिंदु धर्माला अवमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्ती आणि व्यक्ती यांच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन ‘ऋग्वेद पंडित’, ‘हैदव संस्कृती’ पत्रिकेचे संपादक तथा ‘स्टुडिओ १८’ वृत्तवाहिनीचे संस्थापक श्री. सांकेपल्ली भरतकुमार शर्मा यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.
सनातन संस्थेच्या वतीने येथील श्री वीसामौध गोउभुज समाजाच्या सभागृहामध्ये १६ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही संबोधित केले. महोत्सवाचा आरंभ सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये साधक विद्यार्थी कु. तिरुमलेश याचा सत्कार करण्यात आला.
गुरु मोक्षाला जाईपर्यंत शिष्याची काळजी घेतात ! – समुद्राल नरसिंह चारी, व्यवस्थापक, रामकृष्ण मठ
इंदूर – आई मुलाची आयुष्यभर काळजी घेते; पण गुरु त्याची मोक्षाला जाईपर्यंत काळजी घेतात, असे प्रतिपादन रामकृष्ण मठाचे व्यवस्थापक श्री. समुद्राल नरसिंह चारी यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै २०२२ या दिवशी येथील जनार्दन गार्डनच्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
क्षणचित्र : ‘स्टुडिओ १८’ या वृत्तवाहिनीवर गुरुपौर्णिमा महोत्सवाचे प्रसारण करण्यात आले, तसेच ‘एव्ही’ वृत्तवाहिनीने गुरुपौर्णिमाविषयीची एक छोटी मुलाखत घेतली.