परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘रथोत्सवा’च्या वेळी साक्षात् वैकुंठात चालत आहोत, असे जाणवणे

श्री. दिलीप नलावडे

१. ‘साक्षात् श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या रथयात्रेत चालायला मिळत आहे’, या विचाराने मन आनंदी आणि निर्विचार होणे

रथोत्सवात भगवंताच्या कृपेने मला ध्वज हातात घेऊन सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. सर्वत्र नामाचा गजर चालू होता. सभोवतालचे वातावरण चैतन्यमय झाले होते.

२. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा निसर्गदेवतेलाही पुष्कळ आनंद झाला आहे’, असे मला जाणवले.

३. ‘आम्ही सर्व साधक वैकुंठात चालत आहोत. त्या वेळी आकाशात सूक्ष्मातून देवता दिसत आहेत’, असे मला जाणवले.

४. साधिकांनी नृत्य केल्यावर ‘वातावरण कृष्णमय झाले’, असे जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विराजमान असलेला रथ श्री रामनाथ मंदिराजवळ आल्यावर साधिकांनी  नृत्य केले. त्या वेळी वातावरण कृष्णमय झाले होते.

५. मार्गात उभे असतांना ध्यान लागणे

काही क्षण माझे ध्यान लागले. एका साधकाने मला हलवून पुढे चालायला सांगितले. ‘मार्गात उभे असतांना ध्यान लागणे’, हे मी प्रथमच अनुभवत होतो.

६. रथोत्सवात सातत्याने माझा भाव दाटून येऊन मला हुंदके येत होते.

७. मी रथोत्सवाच्या वेळी पुष्कळ वेळ उभा होतो. मी अनवाणी चाललो, तरीही मला थकवा आला नाही.

‘हे भगवंता, हे गुरुदेवा, तुम्हीच मला या अनुभूती दिल्यात’, त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. दिलीप ज्ञानेश्वर नलावडे, खडपाबांध, फोंडा, गोवा. (२२.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक