साधकांनी काही रक्कम घालून परात्पर गुरु डॉक्टरांना अर्पण स्वरूपात दिलेला बटवा त्यांनी कार्याकरता परत करणे आणि त्यानंतर धर्मकार्यासाठी काहीही उणे न पडणे

श्री. विजय लोटलीकर

एकदा परात्पर गुरु डॉक्टर मार्गदर्शन आणि सत्संग सोहळा यांसाठी डोंबिवली येथील बोडस सभागृहात येणार होते. त्यांना काहीतरी अर्पण द्यावे; म्हणून आम्ही एक बटवा शिवला आणि त्यात काही रक्कम घातली. त्यांचे मार्गदर्शन झाले. ते जाण्यापूर्वी आम्ही त्यांना बटवा दिला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘याचे काय करायचे ? हे तुम्हीच ठेवा आणि याचा वापर कार्यासाठी करा.’’ त्यांनी असे म्हटल्यावर आम्ही शांत झालो. तो बटवा ठेवला आणि ती रक्कम आम्ही कार्याकरता वापरली. आजही तो बटवा आमच्याकडे आहे. त्या दिवसापासून आम्हाला काही न्यून पडले नाही. जणू ईश्वराच्या संकल्पामुळे हे झाले.

– श्री. विजय लोटलीकर, डोंबिवली, ठाणे. (७.७.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक