‘माझ्याकडे सध्या ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगासाठी ‘स्लाईड’ सिद्ध करण्याची सेवा आहे. सेवा करत असतांना मी थोड्या थोड्या वेळाने भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो, ‘देवा, तूच माझ्याकडून ही सेवा जशी गुरुदेवांना अपेक्षित आहे, तशी करवून घे. एकदा मी श्रीकृष्णाला ‘स्क्रिप्ट’मधील (हस्तलिखितातील) एक विषय समजण्यास सोपा करण्यासाठी कसे प्रयत्न करू ?’, असे विचारले. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाला, ‘कोणती संकल्पना किंवा काय करायचे, याविषयी तुझे दायित्व असलेल्या साधकाला विचार अन् ‘ती संकल्पना चित्रात कशी उतरवायची ?’, हे मला विचार.’ यावर चिंतन केल्यावर लक्षात आले, ‘श्रीकृष्ण दायित्व असलेल्या साधकाला विचारून सेवेच्या संदर्भात निर्णय घेण्यास सांगत आहे. त्यानंतर तो गुरुकार्य परिपूर्ण, म्हणजे गुरूंना अपेक्षित असे होण्यासाठी मला मार्गदर्शन करणार आहे.’
– श्री. प्रकाश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |