युरोपमध्ये भीषण उष्णतेमुळे आतापर्यंत १ सहस्र ९०० लोकांचा मृत्यू

लंडन (ब्रिटन) – गेल्या काही दिवसांपासून युरोप खंडामध्ये प्रचंड उन्हाळा चालू आहे. तापमान ४० डिग्री सेल्सियसपर्यंत गेले आहे. या उन्हाळ्यामुळे आतापर्यंत युरोपमध्ये १ सहस्र ९०० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये रस्त्यावरील डांबर, तसेच विमानतळावरील धावपट्टी वितळत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी वर्ष २००३ मध्ये अशाच प्रकारचा उन्हाळा युरोपमध्ये आला होता. त्यात ७० सहस्र लोकांचा मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

निसर्गाच्या विरोधात जाऊन कृती केली, तर निसर्ग त्याचे रौद्ररूप कधीतरी दाखवतोच, हेच या स्थितीवरून लक्षात येते !