शाहीद खान याने ‘मनीष’ बनून हिंदु विद्यार्थिनीवर केले लैंगिक अत्याचार

राजस्थानमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !

भिलवाडा (राजस्थान) – येथील कोतवाली क्षेत्रात एका मोबाईल नेटवर्क आस्थापनामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणार्‍या शाहीद खान याने ‘मनीष’ नावाने बनावट ओळखपत्र बनवून एका महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला मादक पदार्थ पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिची अश्‍लील छायाचित्रे काढली. त्यानंतर तो तिला धमकावू लागल्याची घटना समोर आली आहे.
शाहीद खान एक दिवस पीडित मुलीला धमकावून भाड्याने घेतलेल्या एका खोलीत घेऊन गेला. त्या घराच्या मालकाने केलेल्या चौकशीच्या वेळी तो ‘मनीष’ नसून शाहीद खान असल्याचे मुलीला समजले. पीडित हिंदु मुलीने तेथून स्वत:ची सुटका करून घेतली आणि भिलवाडा येथील कोतवाली पोलीस ठाण्यात शाहीद खान याच्या विरोधात तक्रार केली. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे अशांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको !