पाकिस्तानी पारपत्र जागतिक मानांकनामध्ये शेवटून चौथ्या क्रमांकावर !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जगभरात पारपत्राच्या मानांकनामध्ये पाकिस्तान शेवटून चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२२’च्या अहवालात देण्यात आली आहे. हे मानांकन ‘इंटरनॅशनल एयर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’च्या माहितीवर आधारित आहे. जगभरात असे केवळ ३२ देश आहेत, जेथे पाकिस्तानी नागरिक व्हिसा विना प्रवास करू शकतात. या मानांकनामध्ये पाकच्या नंतर इराक, अफगाणिस्तान आणि सीरिया हे देश आहेत. या मानांकनामध्ये भारत ८७ व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान १०९ व्या क्रमांकावर. भारताचे नागरिक ६० देशांमध्ये  व्हिसा विना प्रवास करू शकतात. चीन ६९ व्या क्रमांकावर आहे. त्याचे नागरिक ८० देशांमध्ये व्हिसा विना प्रवास करू शकतात. जपान पहिल्या, तर दक्षिण कोरिया दुसर्‍या क्रमांकावर आहे. जपानचे नागरिक १९३ देशांत व्हिसा विना प्रवास करू शकतात.