जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथील मद्यालयातील गोळीबारात १४ जणांचा मृत्यू

प्रतीकात्मक छायाचित्र

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – येथील सोवेटो भागामधील एका बारमध्ये (मद्यालयामध्ये) अज्ञाताने केलेल्या बेछूट गोळीबारात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण गंभीररित्या घायाळ झाले. गोळीबारानंतर बंदुकधारी व्यक्ती पांढर्‍या रंगाच्या टोयोटो क्वांटम मिनीबसमध्ये बसून पसार झाली. हा गोळीबार का करण्यात आला ? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस घटनेचे अन्वेषण करत आहेत.