परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेला सुचलेले गुरुपौर्णिमेपर्यंत शेष असलेल्या दिवसांत करावयाचे भावजागृतीचे प्रयत्न

वर्ष २०२१ मध्ये जिल्ह्यातील एका भावसत्संगात एका साधिकेने सांगितले, ‘गुरुपौर्णिमेसाठी ९ दिवस उरले होते. तेव्हा मी ‘ते नवरात्रीचे ९ दिवसच आहेत’, असा भाव ठेवला.’ त्याविषयी चिंतन करतांना ‘मी गुरुपौर्णिमेच्या कालावधीत भावजागृतीचे कोणते प्रयत्न केले पाहिजेत ?’, ते गुरुकृपेने माझ्या लक्षात आले. शेष दिवसांचा अंक आणि ‘त्या दिवशी कोणता भाव ठेवायचा ?’, हे पुढे दिले आहे.

कु. मनीषा माहुर

९ – नवरात्रीचे ९ दिवस आहेत.

८ – अष्टांग साधना करायची आहे.

७ – सप्तचक्रांवर गुरुदेवच विराजमान झाले आहेत.

६ – षड्रिपू दूर करण्याचे प्रयत्न करायचे आहेत.

५ – पंचप्राणांची आरती प्रज्वलित करून गुरुदेवांना अर्पण करायची आहे.

४ – चारही सूक्ष्म देहांनी (टीप १) गुरुदेवांशी एकरूप व्हायचे आहे.

३ – तिन्ही मोक्षगुरूंना (टीप २) शरण जाऊन त्यांचे अखंड स्मरण करायचे आहे.

२ – गुरु-शिष्य भावामध्ये रहाणे. शिष्याला द्वंदातून मुक्त करणारे श्रीगुरुच आहेत.

१ – गुरुदेवांच्या चरणी संपूर्ण समर्पित होऊन त्यांच्याशी एकरूप व्हायचे आहे.

टीप १ – चारही सूक्ष्म देह म्हणजे १. प्राणदेह २. मनोदेह ३. कारणदेह आणि ४. महाकारणदेह.

टीप २ – तीन मोक्षगुरु म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीगुरु आणि सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या कृपेनेच हे प्रयत्न माझ्या लक्षात आले. ‘श्रीगुरूंनीच हे प्रयत्न माझ्याकडून करवून घ्यावेत आणि मला आपल्या श्रीचरणी समर्पित करून घ्यावे’, अशी श्रीगुरुचरणी प्रार्थना आहे.’

– कु. मनीषा माहूर, देहली सेवाकेंद्र, देहली. (१९.७.२०२१)