नाल्याची तक्रार करणार्‍या नागरिकांना आम आदमी पक्षाच्या आमदाराकडून मारहाण

आम आदमी पक्षाचे आमदार अखिलेश त्रिपाठी

नवी देहली – येथील आम आदमी पक्षाचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांच्यावर दोघांना मारहाण केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येथील अशोक विहार परिसरात त्यांनी गुड्डू हलवाई आणि मुकेश बाबू यांना मारहाण केली. यात ते घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. हे दोघे येथे एका कार्यक्रमात खाद्यपदार्थ पुरवण्याचे काम करतांना ही घटना घडली. येथे त्रिपाठी यांची भेट झाल्यावर गुड्डू यांनी त्यांना नाल्याविषयीची तक्रार केली. यामुळे ते अप्रसन्न झाले आणि त्यांनी विटेद्वारे आक्रमण केले. गुड्डू यांना वाचवण्यासाठी गेलेल्या महेश बाबू यांच्यावरही त्रिपाठी यांनी आक्रमण केले.

संपादकीय भूमिका

हे आहे आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप ! जनतेच्या आंदोलनातून स्थापन झालेला पक्षही शेवटी अन्य राजकीय पक्षांप्रमाणे जनताद्रोहीच आहे, हे स्पष्ट होते !