नटोरे (बांगलादेश) येथील हिंदु मुलगी ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात !

इस्लामी बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील नटोरे जिल्ह्यात असलेल्या ‘नटोरे टेक्स्टाईल इन्स्टिट्यूट’मधील विद्यार्थिनी स्निग्धा पाल ही हिंदु मुलगी ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडली आहे.

‘महाविद्यालयाचे प्राचार्य महंमद मोजमेल हे स्निग्धा हिला त्रास देत असून तिचा बुद्धीभेद करत आहेत’, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. तिच्या कुटुंबियांना महाविद्यालयाच्या वसतीगृहात प्रवेशही नाकारला जात आहे, अशी माहिती ‘व्हॉईट फॉर बांगलादेशी हिंदूज्’ या संघटनेने स्वतःच्या ट्विटर खात्याद्वारे दिली आहे.