कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमृत पॉल यांना अटक

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षकांच्या भरतीचा घोटाळा

अतिरिक्त पोलीस महासंचालक अमृत पॉल

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरील व्यक्तीला अटक होण्याची घटना घडली आहेत. पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याच्या प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक अमृत पॉल यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने ४ वेळा चौकशी केल्यानंतर पॉल यांना अटक केली आहे. आतापर्यंत या भरतीतून निवडण्यात आलेल्या ५४५ उमेदवारांपैकी ४० जणांना अटक करण्यात आली आहे. पॉल यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी प्रत्येक उमेदवाराकडून ३० ते ८० लाख रुपये लाच घेतली आहे. कर्नाटक सरकारने पॉल यांना निलंबित केले आहे. पॉल या भरतीच्या वेळी भरती शाखेचे प्रमुख होते.

संपादकीय भूमिका

मोठे अधिकारीच जर भ्रष्टाचारी असतील, तर कनिष्ठ अधिकारी आणि पोलीस शिपाई भ्रष्टाचार करत असतील, तर यात आश्‍चर्य ते काय ? या प्रकरणात पॉल यांच्या मागे कोणते राजकारणी आहेत, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !