अमेरिकेत शिखांवर सातत्याने आक्रमणे होत असल्याने संताप व्यक्त

न्यूयॉर्क – येथील ‘रिचमंड हिल’ भागात असलेल्या ‘साउथ ओजोन पार्क’ क्षेत्रामध्ये २५ जून या दिवशी एका शीख व्यक्तीवर गोळीबार करून तिची हत्या करण्यात आली. सतनाम सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. ‘न्यूयॉर्क पोस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय सिंह एक चारचाकी वाहनात बसलेले असतांना आक्रमणकर्त्याने त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. अमेरिकेत शिखांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
न्यूयॉर्क में सिख युवक को भूना, गर्दन और सीने में गोलियाँ लगने से मौत: CCTV कैमरे में कैद हुई घटना, अप्रैल में भी दो सिख बने थे निशाना#NewYork #Sikh https://t.co/h7vo6ClAFG
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 27, 2022
याआधी १३ एप्रिल २०२२ मध्ये रिचमंड हिल भागातच दोन शिखांवर आक्रमण करण्यात आले होते. त्यांना आधी काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांची पगडी काढण्यात आली होती. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच निर्मल सिंह या ७२ वर्षीय शीख वृद्धावरही आक्रमण करण्यात आले होते. या सर्व घटनांमुळे शिखांनी आंदोलन करत आक्रमणकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !