उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण !

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: यासंबंधीचे ट्वीट करून माहिती दिली. ‘असे असले, तरी प्रकृती एकदम चांगली आहे’, असेही त्यांनी नमूद केले आहे.

‘माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी त्यांना कोणतीही लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करून घ्यावी’, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.