संभाजीनगर – मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन छेडल्यानंतर पुणे येथील शेवटच्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सामान्य नागरिकांना उद्देशून पत्र लिहिणार असल्याचे घोषित केले होते. ते पत्र वाटण्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तंबीची नोटीस दिली आहे. भोंग्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन करणारे पत्र घरोघरी पोचवण्याचा प्रारंभ जवाहर कॉलनी येथील दुर्गामाता मंदिरातून करण्याची सिद्धता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. याची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी भारतीय दंड विधान संहिता कलम १४९ नुसार मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह इतरांना नोटीस पाठवली आहे.
‘पत्र वाटपाने कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे. ‘नोटिसांचा काहीही परिणाम होणार नाही. पत्र वाटप चालूच राहील’, असे खांबेकर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाइतकी वर्षे अनधिकृत भोंग्यांविषयी पोलिसांनी काय केले ? |