
झालावाड (राजस्थान) – भाजपने निलंबित केलेल्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या केलेल्या कथित अवमानावरून देशात आणि इस्लामी देशांत शर्मा यांना विरोध केला जात आहे. यासह भारतातील काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनीही शर्मा यांना विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर येथील काँग्रेसचे नेते प्रमोद शर्मा यांनी नूपुर शर्मा यांचे समर्थन केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ प्रमोद शर्मा यांनी येथे मोर्चा काढला. या वेळी त्यांनी ‘भारताच्या या कन्येच्या पाठीशी संपूर्ण हिंदु समाज ठामपणे उभा आहे’, असे म्हटले.
सौजन्य आजतक
प्रमोद शर्मा पुढे म्हणाले की, एका वृत्तावाहिनीच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात काही गोष्टी बोलल्या गेल्या. खरे पहाता त्या गोष्टींमध्ये फार काही नव्हते; पण मीठमसाला लावलेल्या बातम्या बनवणार्या जुबेर खान याने ‘अल्ट न्यूज’च्या माध्यमातून या प्रकरणाला वेगळे वळण दिले. त्या माध्यमाने एका विशिष्ट समाजाच्या लोकांसमोर नूपुर शर्मा यांची खलनायक म्हणून प्रतिमा उभी केली. त्यामुळे नूपुर शर्मा यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. झालावाड विभागातील ब्राह्मण समाजासह संपूर्ण हिंदु समाज अशा धमक्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो. नूपुर यांना मिळणार्या धमक्यांमुळे त्यांनी अजिबात घाबरू नये. समस्त हिंदु समाज भारताच्या या कन्येसोबत ठामपणे उभा आहे.
नूपुर शर्मा यांच्या विरोधात श्रीनगर बंद !
नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी पैगंबर यांच्या केलेल्या कथित अवमानाच्या प्रकरणी १७ जून या दिवशी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे बंद पाळण्यात आला होता.
कॉकरोच वक्तव्य ते भारतविरोधी कथानकांचे जाळे : मानसिक युद्ध पालटत्या जगाचे !
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस