ब्रिटनची ‘ग्रूमिंग गैंग’ !लहान मुलांना भेटवस्तू देऊन अथवा त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करणे या प्रक्रियेला ‘ग्रूमिंग’ म्हणतात. ब्रिटनमधील अल्पवयीन मुलींच्या भोळेपणाचा वापर करून त्यांना फसवले जाते. त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. या ‘ग्रूमिंग गँग’मध्ये प्रामुख्याने मुसलमान असून गेल्या ४० वर्षांमध्ये किमान ५ लाख मुसलमानेतर मुलींवर बलात्कार करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. |
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये अल्पवयीन बलात्कारित मुलींची क्षमा मागितल्यास त्यांच्यावर अत्याचार केलेल्या ‘ग्रूमिंग गैंग’मधील मुसलमानांचे गुन्हे माफ करण्यात येत आहेत. अशी तब्बल ८७० प्रकरणे समोर आली आहेत. अनेक पीडितांनी सांगितले की, त्यांचे लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात येते. एवढे गंभीर आरोप असूनसुद्धा ब्रिटन पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करतांना दिसत नाही. ‘द मिरर’ने प्रकाशित केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या एका मोहिमेच्या अंतर्गत अल्प तीव्रतेच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींनी क्षमा मागितल्यास त्यांना सोडण्यात येत आहे; परंतु ब्रिटन पोलीस त्याचा प्रयोग ‘ग्रूमिंग गँग’च्या बलात्काऱ्यांना सोडण्यासाठीही करते. ‘साउथ यॉर्कशायर’च्या पोलिसांनी किमान ७८ प्रकरणांमध्ये या धोरणाचा वापर केला, तर डरहम, नॉटिंगमशियर मध्ये १३ हून अल्प आयू असलेल्या मुलींवर केलेल्या बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये याचा वापर करण्यात आला. अन्य शहरांतील पोलिसांनीही या धोरणाचा वापर लैंगिक शोषणाच्या गुह्यांची प्रकरणे निकालात लावण्यासाठी केला.
संपादकीय भूमिका
|