अमरनाथ यात्रेवर आतंकवादी आक्रमण करण्यासाठी ड्रोनद्वारे पाठवलेले बाँब सापडले

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरात पोलिसांनी पाकिस्तानमधून आलेले एक ड्रोन पाडले. यात ७ ‘स्टिकी बाँब’ (यांना चुंबकीय बाँबही म्हणतात. त्यांना कुठल्याही वाहनांवर बसवले जाऊ शकते आणि रिमोट कंट्रोलद्वारे त्यांना लांबून नियंत्रित करून नियोजित वेळी स्फोट घडवून आणला जाऊ शकतो.), तसेच ७  ग्रेनेड सापडले. जिहादी आतंकवाद्यांकडून अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर स्टिकी बाँब पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेच्या बसगाड्यांवर आक्रमण करण्यासाठी आतंकवादी या बाँबचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत.

संपादकीय भूमिका

‘अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाल्यास मुंबईतून हज यात्रेसाठी एकही विमान किंवा नौका जाऊ दिली जाणार नाही’, अशी चेतावणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती, त्याचीच आठवण हिंदूंना पुन्हा होत असेल !