देवलोकी जमली बैठक देवतांची ।
विचार करण्या
कलियुगाच्या प्रभावाची ।।
सात्त्विक जनतेची पीडा
हरण करण्याचा विचार ।
करू लागल्या देवीदेवता,
महर्षि थोर थोर ।
ध्यान सर्वांचे समष्टी कल्याणावर रं..जी..जी..जी..जी ।। १ ।।
भारत स्वतंत्र होण्याचा तो काळ ।
पण त्या आधी उगवला वर्ष १९४२ चा तो काळ ।।
झाले ते धन्य आठवले कुळ ।।
प्रगटले साक्षात् उदरी श्रीकृष्णासम बाळ ।
त्याचे माता-पित्यांनी केले ‘जयंत’ असे नामकरण रं..जी..जी..जी..जी ।। २ ।।
आज करतो वर्णन शाहीर पूर्ण त्यांचे जीवन ।
बालक हळूहळू वाढू लागले ।।
यौवनावस्थेत करिती परदेशी गमन ।
ज्ञानप्राप्ती करू लागले स्थुलातून ।।
प्रसिद्धीस आले ‘संमोहन तज्ञ’ म्हणून रं..जी..जी..जी..जी ।। ३ ।।
परी ईश्वराचे होते वेगळे नियोजन ।
समाधान होईना वैद्य म्हणून जगण्या ।।
आले जयंतरावांसी सत्य समजून ।
मनाच्या स्तरावरील उपाय पहाती शोधून ।
त्यातून उमगली सूक्ष्म तत्त्वे त्या लागून रं..जी.जी..जी..जी ।। ४ ।।
मन करू लागले सूक्ष्म संशोधन ।
संशोधन करता करता साधनेचे महत्त्व जाणून ।।
झाला आता आध्यात्मिक जीवनाला आरंभ ।
भेटी घेतल्या संतांच्या, त्यासह गुरुदीक्षा मिळाली ।
संत भक्तराज महाराजांकडून रं..जी..जी..जी..जी ।। ५ ।।
संत भक्तराज महाराजांचे अनमोल मार्गदर्शन ।
सेवेतूनी केले तन-मन अर्पण ।।
बाबांचा (टीप १) भंडारा अन् अमृत महोत्सवात
सेवा केली झोकून ।
असा जयंतराव
शिष्य शोभतसे महान रं… जी..जी..जी..जी ।। ६ ।।
संत भक्तराजांचे झाले देहावसान ।
त्यांच्या इच्छेने पादुकांचे झाले रामनाथी आगमन ।
आता जुळले प.पू. रामानंद महाराजांशी भावबंधन ।।
परी केले अध्यात्मप्रसाराच्या दिशेने मार्गक्रमण ।
आणि घेतले काही साधकांसी जोडून रं.. जी..जी..जी..जी।। ७ ।।
श्री जयंतराव झाले आरूढ गुरुपदावर ।
केली ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ स्थापन ।।
सभा घेऊन साधनेचे महत्त्व पोचवले विश्वात ।
प्रसाराचा ओघ वाढला रं.. जी..जी..जी..जी ।। ८ ।।
आरंभ झाला ग्रंथनिर्मितीच्या कार्याला ।
ग्रंथसेवा करण्या देती साधकांना सूक्ष्मातील ज्ञान ।।
गुरुकृपायोग शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा
मार्ग शिकवती साधकाला ।
महत्त्व दिले भाव, आनंद अन् स्वभावदोष,
अहं निर्मूलनाला रं.. जी..जी..जी..जी ।। ९ ।।
मग जाहली स्थापना पुरोहित पाठशाळेची,
नंतर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची ।।
उन्नती ती साधक-साधिकांची ।
प्रीती भारी साधकांवरी श्री गुरूंची ।।
या गोकुळात घडे खाण १२१ संतरत्नांची (टीप २) रं.. जी..जी..जी..जी ।। १० ।।
गुरुदेवांच्या प्रेरणेने साधकांच्या साधनेसाठी
होई निर्मिती आश्रमांची ।
वर्ष १९९८ मध्ये झाली सुरुवात ‘सनातन प्रभात’ची ।।
‘सनातन प्रभात’ करी धर्मविरोधी विचारांचे
खंडण अन् जनजागृती ।
पोचत असे घरोघरी, दिशा देई हिंदु राष्ट्र-स्थापनेची रं.. जी..जी..जी..जी ।। ११ ।।
वाटचाल चालू झाली आता हिंदु राष्ट्र्राच्या दिशेने ।
धर्म लोप पावू लागला, दुष्प्रवृत्ती वाढतच गेल्या ।।
कंबर कसली साधकवर्गाने आणि साऱ्या संतांनी ।
‘हिंदु जनजागृती समिती’ची केली स्थापना सर्व महात्म्यांनी रं.. जी..जी..जी..जी ।। १२ ।।
रामनाथी जाहले वैकुंठ ।
अनेक सेवांची झाली निर्मिती ।।
कलामंदिराने रामनाथी वास्तू झाली सुशोभित ।
समाजातील संत येती आश्रमाच्या भेटीला ।
करती यज्ञयाग अन् विश्वाच्या कल्याणासाठी देती आशीर्वाद रं.. जी..जी..जी..जी..।। १३ ।।
साधकांच्या त्रासांच्या निवारणार्थ गुरुदेव सांगू
लागले नामजपादी उपाय ।
साधकांचे त्रास घेती स्वतःवर ।।
त्यामुळे साधक करत असे साधना सहज ।
साधकांच्या साधनेसाठी झटत असे ही गुरुमाऊली थोर रं.. जी..जी..जी..जी ।। १४ ।।
वर्ष २००९ मध्ये महामृत्यूयोगाचे संकट आले ।
तरी डगमगले नाहीत सेवा करती त्या स्थितीत ।।
अनेक संतांनी केले मृत्यूयोगावर उपाय ।
ईश्वरी कृपेने टळले महामृत्यूयोगाचे संकट रं.. जी..जी..जी..जी ।। १५ ।।
साधकांवर कृपादृष्टी सतत असे ईश्वराची ।
सनातनचे रहस्य उलगडले सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून ।।
पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्याशी जोडले आता भावबंधन ।
गुरूंचा महिमा त्यांनी वर्णिला आपल्या वाणीतून रं.. जी..जी..जी..जी ।। १६ ।।
महर्षींच्या आज्ञेने गुरुदेवांचे रूप ठाकले सध्या वेषात ।
मग शोभतसे फेटा घालून, साधक जाती भारावून ।।
नयनी कधी न पाहिले ते रूप श्रीकृष्ण आणि रामाचे ।
शेषशय्येवर पहुडले ते विष्णुनारायण ।
तर कधी हाती कमळ घेऊन उभे राहिले,
ते रूप सत्यनारायण ।।
साधकांच्या आनंदासाठी तयार होती गुरुदेव ।
असा हा आनंद महर्षींनी दिला या वैकुंठात रं.. जी..जी..जी..जी ।। १७ ।।
महर्षींना विचार आता समष्टी कल्याणाचा ।
आता दोन देवी अवतरल्या या वैकुंठात ।।
एक असे सत्शक्ति बिंदामाता (टीप ३),
दुसरी चित्शक्ति अंजलीमाता (टीप ४) ।
झाल्या आध्यात्मिक उत्तराधिकारी घोषित ।।
असे महर्षींनी दिले तीन गुरु सनातन संस्थेस ।
साधकांनी ठेवावी श्रद्धा अन् रहावे भावात रं..जी..जी..जी..जी ।। १८ ।।
आता शाहीर करतो या पोवाड्याचा गोड शेवट ।
असती हे थोर गुरुदेव लाभले या जन्मात ।।
संकल्प करती हिंदु राष्ट्राचा, साधनेचा वारू उधळला चौफेर ।
या कार्यात उचलू खारीचा वाटा तो सान ।
तव कृपेची प्रार्थना करून, त्रिवार मुजरा करितो शाहीर हा भावपूर्ण रं.. जी..जी..जी..जी ।। १९ ।।
टीप १ – प.पू. भक्तराज महाराज यांचा
टीप २ – १.५.२०२२ पर्यंत गुरुकृपायोगानुसार साधना करून १२१ साधक संतपदी आरूढ झाले.
टीप ३ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप ४ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०२२)
|