जोधपूर (राजस्थान) येथे मुसलमानांकडून शरणार्थी दलित हिंदु कुटुंबाला मारहाण

जोधपूर (राजस्थान) – येथे पाकमधून आलेल्या शरणार्थी दलित हिंदु कुटुंबावर ३०० हून अधिक मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केल्याची घटना २६ मे या दिवशी घडली. यात ३ जण घायाळ झाले. वाहनांच्या अपघातावरून झालेल्या वादातून हे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. हिंदु कुटुंबाने या प्रकरणी पोलिसांनी मुसलमानांचा पक्ष घेतल्याचा आरोप केला आहे. (काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? – संपादक)

या आक्रमणात घायाळ झालेल्या भुरालाल यांनी सांगितले, ‘आम्ही १२ वर्षांपूर्वी पाकच्या हैदराबाद येथून भारतात आलो आहोत. दुपारी आमच्या मारुति व्हॅनला मुसलमानांच्या पिकअप गाडीने ठोकर मारली. मी त्यांना विरोध केल्यावर ते माझ्याशी वाद घालू लागले आणि मारहाण करू लागले. नंतर त्यांनी येथील बकरी मंडी भागातून ३०० हून अधिक मुसलमानांना बोलावले. ते माझ्या घरात आणि दुकानात घुसले अन् माझा भाऊ आणि घरातील महिलांना मारहाण केली. यात आम्ही सर्वजण घायाळ झालो. घटनेनंतर पोलीस आले.’

संपादकीय भूमिका

  • पाकमध्ये मुसलमानांकडून अत्याचार होतो; म्हणून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंवर येथेही जर आक्रमण होत असेल, तर ते सरकार आणि हिंदू यांना लज्जास्पद !
  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ‘तेथे हिंदूंना न्याय मिळणार नाही’, असेच हिंदूंना वाटते !
  • ‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे या घटनेविषयी बोलतील का ?