श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन घेण्यासाठी आलेली गाय आणि तिला तितक्याच प्रेमाने कुरवाळणाऱ्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

मी रात्री ११ वाजता ध्यानमंदिरात १४.१.२०२२ या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक वाचत होते. त्या दैनिकात पृष्ठ क्रमांक ६ वर ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दैवी दौऱ्यावर असतांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन गाडीत येऊन बसल्यावर त्यांच्याजवळ आलेल्या गायीला कुरवाळत आहेत’, असे छायाचित्र होते.

श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन गाडीत बसल्यावर जवळ आलेल्या गायीला कुरवाळतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे गायीला कुरवाळतांनाचे छायाचित्र पहातांना जाणवलेली सूत्रे

अ. कोणत्यातरी जन्मात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि ती गाय यांचे ऋणानुबंध होते; म्हणून त्यांना पाहून गाय त्यांचे दर्शन घेऊन स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आली आहे.

. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या महालक्ष्मी आहेत. प्रत्यक्ष महालक्ष्मीने गायीच्या डोक्यावर हात ठेवला आहे. त्यामुळे त्या गायीचा उद्धार झाला आहे.

इ. त्या छायाचित्रातील गाय नामजपात मग्न असून ती ध्यानस्थ आहे.

ई. गायीमध्ये लीनता, नम्रता आणि शरणागत भाव आहे.

उ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गायीच्या डोक्यावर हात ठेवल्याने गाय निःशंक झाली आहे.

ऊ. मला ‘त्या छायाचित्राकडे बघतच रहावे’, असे वाटले.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे गायीला कुरवाळतांनाचे छायाचित्र पहातांना आलेली अनुभूती

ते छायाचित्र पहातांना एक क्षणभर मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हाताची हालचाल जाणवली. ‘त्यांनी गायीच्या डोक्यावर ठेवलेला हात वर उचलून पुन्हा तिच्या डोक्यावर ठेवला’, असे मला दिसले. तेव्हा ‘ते छायाचित्र जिवंत आहे’, असे मला जाणवले.

– रामाची दासी,

(सुश्री (कु.)) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक