१. सौ. उषा बर्नवाल, समस्तीपूर
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्तच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात त्यांचे छायाचित्र पाहून ‘ते बोलत आहेत’, असे मला वाटत होते.
आ. भावसोहळा पहातांना मला माझे शरीर एकदम हलके वाटत होते आणि ‘माझे सर्व शारीरिक त्रास दूर झाले आहेत’, असे मला जाणवले.
२. श्री. विजय झा, मधुबनी
अ. ऑनलाईन’ कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर माझे मन शांत झाले आणि मला दिव्य प्रकाश दिसला.
आ. कार्यक्रम पहातांना मी पुष्कळ शांती अनुभवत होतो.
इ. मी भ्रमणभाषवर कार्यक्रम पहात होतो; परंतु मला ‘मी रामनाथी आश्रमात सगळ्या साधकांमध्ये बसलो असून ‘एक सकारात्मक ऊर्जा माझ्या सभोवताली आहे’, असे अनुभवता येत होते.
ई. त्या दिवशी परात्पर गुरुदेवांनी सत्संगात सांगितले, ‘रात्री हळू आवाजात भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवला, तर मन शांत रहाते आणि चांगली झोप येते.’ हा उपाय केल्यावर आता मला रात्री १०.३० वाजेपर्यंत झोप येते आणि पुष्कळ चांगली झोप लागते. त्यामुळे सकाळी उठल्यावर माझे मन प्रसन्न रहाते. ही अनुभूती मला परात्पर गुरुदेवांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे येऊ शकली.
३. श्री. सुशील चाचान, मुझफ्फरपूर
कार्यक्रमाच्या वेळी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व सतत जाणवत होते. त्यांचे पाद्यपूजन चालू असतांना ‘त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य माझ्या दिशेने येत आहे’, असे मला वाटत होते.’
४. सौ. पूनम चाचान, मुझफ्फरपूर
साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पूजनाची सिद्धता करत होते. तेव्हा माझ्या मनाला पुष्कळ शांत वाटत होते. तेथील दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश मला वेगळाच जाणवत होता.
५. सौ. उर्मिला बारोलिया, मुझफ्फरपूर
अ. परात्पर गुरु डॉक्टर आणि साधक यांच्यातील संवाद ऐकून मला वाटले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले किती लहान लहान गोष्टींकडेही पूर्ण लक्ष देतात अन् आपण किती निष्काळजी आहोत. आपणही साधना चांगली करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.’
आ. परात्पर गुरुदेवांना पाहून ‘साक्षात् ईश्वर माझ्यासमोर उभा असून माझ्या पेशीपेशीत उत्साह आणि आनंद भरून राहिला आहे’, असे मला वाटत होते.
६. सौ. मनीषा मिश्रा, मुझफ्फरपूर
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले संपूर्ण सृष्टीमध्ये धर्मसंस्थापनेसाठी भगवान विष्णूचे विश्वव्यापी रूप घेणार आहेत’, असा विचार माझ्या मनात येऊन माझी भावजागृती झाली.
आ. कार्यक्रमात गुरुदेव साधकांशी संवाद साधत असतांना मला जाणवले, ‘माझा गुरुदेवांशी संवाद चालू असून ते माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत. त्यांच्याकडून माझ्या दिशेने ज्ञानाचा प्रकाश येत आहे.
७. सौ. सुनीता कुमारी सिंह, पाटणा
अ. कार्यक्रम पहातांना मला जाणवले, ‘भगवान श्रीविष्णु आमच्यामध्ये सगुण रूपात बसला असून आम्ही सर्व जण रामनाथी आश्रमात परात्पर गुरुदेवांच्या समीप बसलो आहोत.’ तेव्हा माझे मन पुष्कळ प्रसन्न होऊन माझी भावजागृती झाली.
आ. या सोहळ्यानंतर मला ध्यानमंदिरातील सर्व देवतांमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवले. मला त्यांच्या समवेत श्री महालक्ष्मी रूपात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्री दुर्गादेवीच्या रूपात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचेही दर्शन झाले. (सर्व सूत्रांचे वर्ष २०२०)
|