जम्मू येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मशिदीमधील नमाजठणाच्या वेळी केले हनुमान चालिसाचे पठण !

अनेकदा तक्रार करूनही मशिदीवरील भोंग्यांचा आवाज न्यून न झाल्याने विद्यार्थ्यांचा विरोध

पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना कह्यात घेतले

जम्मू – येथील जीजीएम् सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येथे असणाऱ्या मशिदीतील नमाजपठणाच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले. महाविद्यालयाच्या जवळ असणाऱ्या मशिदीतून प्रत्येक शुक्रवारी भोंग्यांवरून अजान ऐकवली जाते. याचा आवाज महाविद्यालयात येतो. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत हनुमान चालिसाचे पठण केले. यानंतर पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना कह्यात घेतले. त्यांना काही काळ पोलीस ठाण्यात नेऊन बसवून ठेवले.

या विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘महाविद्यालय व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन यांना अनेक वेळा मशिदीवरील भोंग्यांचा आवाज महाविद्यालयात येत असल्याने अभ्यासामध्ये अडथळा निर्माण होतो’, असे सांगितले. त्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन यांनी मशीद कमिटीशी चर्चाही केली; मात्र भोंग्याचा आवाज न्यून झाला नाही. त्यामुळेच आम्ही हनुमान चालिसाचे पठण करण्याचा निर्णय घेतला.’

संपादकीय भूमिका

  • सर्वाेच्च न्यायालयाने देशात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये या परिसरांत ‘शांतता क्षेत्र’ निर्माण करण्यात आदेश दिला आहे. असे असतांना महाविद्यालयाजवळील मशिदीवरील भोंग्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असतांना प्रशासन काय करत आहे ?
  • जर कुणी आदेशाचे पालन करत नसेल, तर प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून अशा प्रकारचा विरोध करण्याची वेळ येऊ नये !