कोकण विभागातील ११ सरपंच आणि १ उपसरपंच यांना अधिकारपदावरून काढले !

सरपंच आणि उपसरपंच यांनी गैरवर्तन, तसेच गैरव्यवहार केल्याचे प्रकरण

ठाणे, १२ मे (वार्ता.) – कोकण विभागातील एकूण ११ सरपंच आणि १ उपसरपंच यांना अधिकार अन् सदस्य पदांवरून काढण्यात आले. ही कार्यवाही विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील यांनी केली. कोकण विभागांतर्गत ग्रामपंचायतींवर झालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.

कोकण विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या माध्यमातून होणारे गैरवर्तन, तसेच गैरव्यवहार यांमुळे ही कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेने सादर केलेल्या अहवालानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ११ ग्रामपंचायतींचे सरपंच, तर पालघर जिल्ह्यातील १ उपसरपंच यांना त्यांच्या अधिकार पदावरून आणि सदस्य पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

सरपंचांकडूनच असे प्रकार होत असतील, तर ते गाव आणि ग्रामस्थ यांचे दायित्व कसे पार पाडणार ?