श्री गणेशचतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास इच्छुक असणाऱ्यांनी रेल्वे तिकिटाचे त्वरित आरक्षण करावे !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘३१.८.२०२२ या दिवसापासून गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. या काळात अनेक जण आपल्या मूळ गावी, तसेच नातेवाइकांकडे जातात.

प्रवासाच्या दिनांकाच्या १२० दिवस आधीपासूनच रेल्वे तिकिटांचे आरक्षण चालू होत असल्याने वेळेतच आरक्षण करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवासी, तसेच दलाल रेल्वे तिकीटे आरक्षित करतात. बस, तसेच ट्रॅव्हल्स यांच्या तिकीट दरात आयत्या वेळी मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते आणि प्रवाशांना अधिक मूल्य देऊन तिकीट काढावे लागते.

श्री गणेशचतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास इच्छुक असलेल्यांसाठी रेल्वे तिकिटाचे आगाऊ आरक्षण (ॲडव्हान्स् बुकिंग) चालू होत आहे. इच्छुकांनी रेल्वे तिकीट त्वरित आरक्षित करून घ्यावे.

प्रवासाचे नियोजन करून तिकिटांचे आरक्षण आताच करा आणि आयत्या वेळी होणारी गैरसोय टाळा !’

(२.५.२०२२)