मलेरकोटला (पंजाब) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडकावण्यात आले खलिस्तानी झेंडे !

मलेरकोटला (पंजाब) – येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ‘खालिस्तान’चे झेंडे फडकावण्यात आले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. पोलिसांनी नंतर हे झेंडे काढून टाकले असून ते लावणार्‍यांचा शोध घेण्यात येत आहे. बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंतसिंह पन्नू याने २९ एप्रिल या दिवशी हरियाणाच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचे आवाहन केले होते. हरियाणा पंजाब राज्याचाच भाग असल्याचा दावा त्याने केला होता.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांना पकडून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावा !