१२.४.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. अनिता प्रकाश घाळी (वय ६७ वर्षे) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. १३.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.३० वाजता साधिका त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर तिचे शरीर हळूहळू कडक होते’, असे मी ऐकले होते; परंतु सौ. घाळीकाकूंचा मृत्यू होऊन १२ घंटे झाल्यावरही त्यांचे शरीर अगदी जिवंत असल्याप्रमाणे मऊ लागत होते. त्यामुळे मला त्यांच्या हातात बांगड्या सहजतेने भरता आल्या.
आ. ‘त्या वास्तूत कुणाचे निधन झाले आहे’, असे वाटत नव्हते.
२. सौ. नेहा निरंजन दाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘मला तेथील वातावरणात दाब जाणवला नाही किंवा भीतीही वाटली नाही.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १५.४.२०२२)
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !