मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून ‘पुरोगामी’त्वाचा आव आणत हिंदुद्वेष कायम !
उद्गीर – नाशिक येथे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात सरस्वतीपूजन करण्यात आले नाही. तीच अयोग्य विचारसरणी घेऊन उद्गीर येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही सरस्वतीपूजन करण्यात आले नाही, तसेच अन्य कोणत्याही देवतेचे पूजन उद्घाटनप्रसंगी करण्यात आले नाही. असे करून मराठी साहित्य महामंडळ, संयोजक आणि आयोजक यांनी ‘आम्ही ‘पुरोगामी’ आहोत’, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सरस्वतीपूजन न करून देवीचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न केला, तरी त्यामुळे देवतेचे महत्त्व कणभरही अल्प होत नसून संमेलनाचा खुजेपणा मात्र यातून पुढे येत आहे ! आतातरी स्वरस्वतीपुत्र म्हणजेच सारस्वतांनी यापुढील काळात अशा संमेलनांना उपस्थित रहायचे का ? ते ठरवण्याची वेळ आली आहे ! – संपादक)