
मुंबई – आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांचे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यासमवेत असलेले आर्थिक व्यवहार बाहेर आले आहेत. अन्वेषण यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. सरकारच्या भ्रष्टाचाराचे पैसे ‘मनी लॉड्रिंग’ करण्यात साहाय्य करणारे नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत ? याची माहिती मुख्यमंत्र्यांनी जनतेला द्यावी, असे आवाहन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १५ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, ‘‘काही दिवसांत अन्वेषण यंत्रणा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढेल. चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्या आस्थापनांतील व्यवहार समोर येऊनही ठाकरे कुटुंबियांनी एक शब्दही उच्चारला नाही. ठाकरे कुटुंबीय नंदकिशोर चतुर्वेदी यांचा ‘मनी लॉड्रिंग’साठी वापर करत होते, हे सत्य मानायचे का ?’’
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !