गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाचे परदेशातील इस्लामी संस्थांशी संबंध !

(म्हणे) ‘अल्लाच्या घरी म्हणजे स्वर्गात पुष्कळ अप्सरा (हूर) मिळतील !’ – ‘आयआयटी’तून ‘केमिकल इंजिनियरिंग’चे शिक्षण घेतलेला मुर्तझा

भारतातील क्रमांक २ च्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या धर्मांधाच्या या कृतीवरून ‘धर्मांधांनी कितीही उच्चशिक्षण घेतले, तरी त्यांच्यातील जिहादी मानसिकता जात नाही आणि त्यांना धर्मच महत्त्वाचा असतो’, हे सिद्ध होते. सच्चर आयोगाच्या शिफारसी त्वरित कार्यान्वित करण्याची आणि मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची सवय लागलेली काँग्रेस, पुरो(अधो)गामी आदींचा चमू आता गप्प का ? – संपादक  

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाची कसून चौकशी चालू आहे. तो इस्लामिक स्टेट, तसेच परदेशातील अनेक इस्लामी संस्था यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. ‘अल्लाच्या घरी म्हणजे स्वर्गात पुष्कळ अप्सरा (हूर) मिळतील. तिथे पत्नीचे काय काम ? देवाच्या घरी जायचे, तर सर्व येथेच सोडावे लागेल’, असे त्याने चौकशीच्या वेळी पोलिसांना सांगितले.

आयआयटी, मुंबईसारख्या जगद्विख्यात महाविद्यालयातून ‘केमिकल इंजिनियरिंग’चे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मुर्तझा बहुराष्ट्रीय आस्थापनातील नोकरी सोडून गोरखपूरला आला. त्यानंतर त्याने कुटुंंब आणि समाज यांच्याशी कोणताही संबंध येऊ नये, यासाठी स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. याविषयी तो म्हणतो, ‘अल्लाच्या घरी केवळ अल्लाचेच ऐका आणि अल्लाच्या मागार्ने चला, त्यानंतर निश्‍चितच स्वर्ग मिळेल !’

एन्.आय.ए. करणार चौकशी !

मुर्तझाला याला वाचवण्यासाठी त्याचे वडील सुप्रसिद्ध डॉ. के.ए. अब्बासी त्याला ‘मनोरुग्ण’ ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु आतंकवादविरोधी पथकाला तो अत्यंत ‘धूर्त’ असल्याचा संशय आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन्.आय.ए.) आता या प्रकरणी मुर्तझाची चौकशी करणार आहे.

इस्लामी संस्थांना पैसे पाठवत होता मुर्तझा !

मुर्तझाच्या बँक व्यवहारांचा तपशील उजेडात आला आहे. गतवर्षी जून मासात मुर्तझाने क्रेडिट कार्डच्या साहाय्याने केलेले काही संशयास्पद व्यवहार सुरक्षायंत्रणांच्या हाती लागले. त्यावरून मुर्तझा ‘पे पाल’च्या माध्यमातून परदेशातील अनेक इस्लामी संस्थांना पैसे पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने मागील ४ – ५ मासांत शमीउल्लाह नावाच्या व्यक्तीच्या खात्यातही अनेकदा सहस्रो रुपये जमा केले. एवढेच नाही, तर तो सीरियातील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ‘त्याने अनेकदा जिहादी कारवाया करण्याची शपथही घेतली आहे.