कोलार (कर्नाटक) येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागातील धर्मांधांकडून दगडफेक !

  • देशात हिंदूंच्या सणांच्या मिरवणुकीवर अशा प्रकारच्या आक्रमणाच्या घटना घडतच असतात, तरीही निधर्मीवादी ‘देशात अल्पसंख्य असुरक्षित आहेत’, असे बेंबीच्या देठापासून ओरडत असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • मोहर्रमच्या मिरवणुका हिंदूबहुल भागातून जात असतांना कधी अशी आक्रमणे होतात का ? – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही मिरवणूक जहांगीर मोहल्ला येथून जात असतांना तेथे दगडफेक झाली. या वेळी उपस्थित पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेत कुणीही घायाळ झाले नाही. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.