‘हल्दीराम’ आस्थापनाने उपवासाच्या पदार्थाच्या पाकिटावर उर्दू भाषेत लिखाण केल्याने सामाजिक माध्यमांतून विरोध

उपवासाच्या पदार्थाच्या पाकिटावरील उर्दू भाषेतील लिखाण

नवी देहली – खाद्यपदार्थ बनवणाऱ्या ‘हल्दीराम’ या आस्थापनाने त्याच्या उपवासाच्या संदर्भातील खाद्यपदार्थावरील पाकिटावर उर्दू भाषेमध्ये लिखाण केले आहे. सामाजिक माध्यमांतून याचे छायाचित्र प्रसारित झाले असून त्यास विरोध केला जात आहे. याविषयी हल्दीराम आस्थापनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

सामाजिक माध्यमांतून म्हटले जात आहे की, या पाकिटावर हिंदी किंवा इंग्रजी भाषांमध्ये लिखाण असायला हवे होते; मात्र हल्दीरामने यावर जाणूनबूजून उर्दू भाषेत लिखाण लिहिले आहे. हल्दीरामच्या उपवासाच्या पाकिटामध्ये अशी कोणती गोष्ट मिसळली जाते, ज्यामुळे ते लोकांना कळू नये, असा त्याचा उद्देश आहे ? उर्दूमध्ये लिखाण लिहून हिंदूंचा विश्वासघात केला जात आहे. त्यामुळे हल्दीरामच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला, असे आवाहन केले जात आहे. काहींनी हल्दीरामने यासंदर्भात क्षमा मागण्याचीही मागणी केली आहे.