पू. रत्नमालाताई सनातनच्या संतमालेतील अनमोल रत्न शोभती ।

६.३.२०२२ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पू. रत्नमाला दळवी यांना सनातनच्या ११८ व्या समष्टी संत म्हणून घोषित केले. त्यानिमित्त सनातनचे पू. शिवाजी वटकर यांनी अर्पण केलेले कवितापुष्प येथे दिले आहे.

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

 

पू. शिवाजी वटकर

पू. रत्नाताई तीव्र शारीरिक अन्
आध्यात्मिक त्रासांतही आनंदी रहाती ।
तळमळीने सहसाधकांकडून
व्यष्टी अन् समष्टी साधना करवून घेती ।। १ ।।

तत्त्वनिष्ठ राहूनी साधकांना त्यांच्या चुका सांगती ।
साधकांना स्वभावदोषांसह स्वीकारून प्रेमाने घडवती ।। २ ।।

तळमळ, भाव, भक्ती अन् श्रद्धा ठेवूनी ताई साधना करती ।
साधकांना साधनेत साहाय्य करूनी,
समष्टीची घडी बसवती ।। ३ ।।

पू. ताई सनातनच्या आदर्श चित्रगुप्त दैवत शोभती ।
व्यष्टी साधना अन् सेवा यांचा लेखाजोखा (टीप १)
विष्णुचरणी अर्पिती ।। ४ ।।

पू. ताई ‘अहंशून्यता अन् गुरूंप्रती भावभक्ती’
यांचे प्रतीक असती ।
परम पूज्यांनी (टीप २) पू. ताईंना आरूढ केले
सनातनच्या समष्टी संतपदी ।। ५ ।।

पू. रत्नमालाताई सनातनच्या संतमालेतील
अनमोल रत्न शोभती ।
कृतज्ञता व्यक्त करूया,
परम पूज्य अन् पू. ताईंच्या चरणी ।। ६ ।।

टीप १ – साधकांच्या साधनेचा आढावा (हिशोब)

टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.३.२०२२)