‘बर्याचदा साधक आणि साधिका वापरत असलेल्या कपड्यांचे धागे बाहेर आलेले असतात. म्हणजे साधकांचा सदरा, पायजमा, धोतर, अन्य पोशाख, तसेच साधिकांच्या साड्या किंवा पोशाख या कपड्यांतून शिलाईचे, त्याचप्रमाणे कापडाचे धागे बाहेर येतात. काही वेळा कपड्यांवर भरतकाम किंवा जरीच्या धाग्यांनी वीणकाम केलेले असल्यास त्यातूनही धागे निघालेले असतात. अशा प्रकारे धागे बाहेर आल्यामुळे ते कपडे चांगले दिसत नाहीत, तसेच त्या कपड्यांची स्पंदनेही खराब होतात.
त्यामुळे साधकांनी कपड्यांचे बाहेर आलेले धागे लगेचच कापावेत. इतरांच्या कपड्यांचे धागे बाहेर आलेले दिसल्यास त्यांनाही धागे कापण्याविषयी सांगावे. ‘यांसारख्या कृतीच्या माध्यमातून ईश्वराचा ‘व्यवस्थितपणा’ हा गुण आपल्याला आत्मसात करता येणार आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२२)