
पुणे – काश्मिरी हिंदूंवरील आघातांना वाचा फोडणार्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात ११ मार्च या दिवशी ‘प्री स्क्रीनिंग’ (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निमंत्रित लोकांना तो दाखवणे) झाले. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, तसेच अभिनेते दर्शन कुमार उपस्थित होते. चित्रपटानंतर त्यांनी सर्व उपस्थितांशी संवाद साधला. त्या निमित्ताने चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी विवेक अग्निहोत्री यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. पराग गोखले यांनी हिंदु जनजागृती समितीने काश्मिरी हिंदूंविषयी केलेल्या कार्याची, तसेच या चित्रपटाला दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदुत्वाच्या भूमिकेतून दिलेली प्रसिद्धी, यांविषयीची माहिती विवेक अग्निहोत्री यांना दिली.
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक