विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांही महत्त्वपूर्ण विषय चर्चेसाठी घ्यावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समितीकडून लोकप्रतिनिधींना निवेदने

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘गड-दुर्गांवरील अतिक्रमण’, ‘मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’ आणि ‘मुंबईतील मालवणी क्रीडासंकुलाचे अनधिकृत नामकरण’ हे विषय चर्चेसाठी घ्यावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समितीकडून लोकप्रतिनिधींना निवेदने

शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्पेकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना उजवीकडून रवींद्र नलावडे आणि सतीश सोनार

मुंबई – ३ मार्चपासून चालू झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात विविध सत्रांमध्ये अनेक विषयांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना काढल्या जातात. महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण विषयांवर या अधिवेशनात चर्चा होऊन त्या संदर्भातील समस्या सोडवल्या जाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीने काही विषयांचे निवेदन सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षातील आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना दिले.

यामध्ये महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण, मुंबईच्या मालवणी येथील क्रीडासंकुलाचे क्रूरकर्मा टिपूचे अनधिकृतपणे दिलेले नाव पालटणे, केंद्राने लागू केलेला ‘मेडिकल एस्टॅब्लिशमेंट एक्ट’ राज्यात लागू करणे हे विषय आहेत. हे विषय प्राधान्याने चर्चेत घेण्याविषयी लोकप्रतिनिधींना विनंती करण्यात आली.

शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना उजवीकडून रवींद्र नलावडे आणि सतीश सोनार

शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, आमदार प्रकाश फातर्पेकर, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार सदा सरवणकर, आमदार अजय चौधरी, (आमदार दत्ताजी पोंगडे), तसेच भाजपचे आमदार राम कदम, आमदार कॅप्टन आर्. तमिल सेल्वन आणि आमदार कालिदास कोळंबकर यांना वरील विषयांचे निवेदन देण्यात आले. हे विषय घेण्याच्या संदर्भात आमदारांनी सकारात्मकता दर्शवली.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना उजवीकडून गिरीश शेलार आणि सतीश सोनार

 

शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना प्रसाद मानकर

 

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (उजवीकडे), यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम (डावीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते उजवीकडून गिरीश शेलार, बबन वाळूंज आणि सतीश सोनार
भाजपचे आमदार कॅप्टन आर्. तमिल सेल्वन (मध्यभागी) यांना निवेदन देतांना सौ. जान्हवी भदिर्के आणि प्रसाद मानकर
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते