कर्नाटक सरकार बजरंग दलाच्या हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची हानीभरपाई देणार

यासह हिंदुत्वनिष्ठांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

पंचायतराज मंत्री  के.एस्. ईश्‍वरप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – शिवमोगा येथे २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी हत्या करण्यात आलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या नातेवाईकांना कर्नाटक सरकारने २५ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री  के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा हे ६ मार्चला हर्ष यांच्या निवासस्थानी जाऊन ही रक्कम त्याच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करणार आहेत. हर्ष यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या एका ‘ऑनलाईन’ मोहिमेच्या अंतर्गत हर्ष यांच्या आईच्या खात्यामध्ये ६० लाखांहून अधिक निधी जमा झाला आहे.

आतापर्यंत १० जणांना अटक

हर्ष यांच्या हत्या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. ‘या प्रकरणी तपासयंत्रणा मुळांपर्यत जाऊन तपास करणार असून या हत्येमागे असलेल्या संबंधितांचा शोध घेणार आहेत, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.