शोपिया येथे २ आतंकवादी ठार : मोठा शस्त्रसाठा जप्त

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही ! – संपादक

शेपिया (जम्मू-काश्मीर) – येथील अमशीपोरा गावात २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी सुरक्षा दल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे २ आतंकवादी ठार झाले. मुज्जमिल आणि आबिद अशी त्यांची नावे आहेत. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.