युक्रेनमध्ये अडकलेल्या संभाजीनगर येथील विद्यार्थिनींनी दिली माहिती
भविष्यात तिसरे जागतिक महायुद्ध झाल्यावर भारतातही अशीच स्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये ! अशा स्थितीत देवाने आपले रक्षण करावे, यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे ! – संपादक
संभाजीनगर – युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या संभाजीनगर येथील विद्यार्थिनींनी ‘युक्रेनच्या स्थानिक प्रशासनाने आम्हाला घराबाहेर पडू नका, विमानतळ, रेल्वेच्या ठिकाणी थांबू नका आदी सूचना दिल्या आहेत. सर्वत्रच तणावाचे वातावरण आहे. येथे पाणी विकत घ्यावे लागते. सकाळपासून त्यासाठी मोठी गर्दी असते. येथे पाण्याचे पाणी देणारी यंत्रे असतात. सर्वांनीच गर्दी केल्याने त्यातील पाणीही संपले आहे. सध्या येथे पाणीही मिळेनासे झाले आहे’, अशी माहिती ‘दिव्य मराठी’च्या वार्ताहराला दूरभाषवरून दिली. भूमिका शार्दूल आणि श्रुतिका चव्हाण या युक्रेनच्या पश्चिम भागातील लबीबमध्ये रहात असून तेथे त्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी वरील माहिती दिली. या दोघींनी भारतात परत येण्यासाठी विमानाचे तिकीट काढले होते; मात्र विमानसेवा बंद करण्यात आल्याने त्या तेथेच अडकून पडल्या आहेत.
युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे पैसे देऊन पाणी, रेशन मिळेना; युक्रेनमध्ये अडकलेल्या औरंगाबादच्या दोन मुलींनी सांगितली आपबीत https://t.co/pNz92BFUPh
— Divya Marathi (@MarathiDivya) February 25, 2022