कलबुर्गी (कर्नाटक) येथे गुन्हा नोंद
|

कलबुर्गी (कर्नाटक) – ते (हिंदुत्वनिष्ठ) कोणते कपडे घालतात ? ते भगवे कपडे घालून हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) हटवण्याविषयी सांगत आहेत. हिजाबवर बंदी घालत आहेत. जे कुणी आमच्या मुलींना हिजाब घालण्यापासून रोखत आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले जातील, अशी धमकी येथील काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांनी दिली. त्यांच्या या धमकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर त्यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुकर्रम खान हे कलबुर्गी जिल्ह्यातील सेदममधील माजी पंचायत सदस्यही आहेत.
मुकर्रम खान यांचे विधान समोर आल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? – संपादक) या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सचिव शिवकुमार यांनी तक्रार केल्यानंतर मुकर्रम खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. शिवकुमार म्हणाले, ‘‘हे विधान आता अधिक प्रसारित होऊ नये. असे विधान आम्हीही करू शकतो; मात्र आम्ही समाजात अशांतता निर्माण करू इच्छित नाही.’’
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक