परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले त्या वेळी देहली येथील श्रीमती ज्योती राणे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणार असल्याचे कळल्यावर आनंद होणे, त्यांची वाट पहात असतांना प्रार्थना अन् कृतज्ञता एकापाठोपाठ पुनःपुन्हा होणे आणि ‘त्यांचे दर्शन झाल्यावर सर्व प्रश्न सुटतील’, याची निश्चिती वाटणे

श्रीमती ज्योती राणे

‘एकदा मी रामनाथी आश्रमात गेले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणार असल्याचे कळल्यावर मला फारच आनंद झाला. त्यांची वाट पहात असतांना माझ्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता एकापाठोपाठ पुनःपुन्हा होत होत्या. ‘आता ते येतीलच. ते कसे दिसत असतील ?’, असे अनेक विचार माझ्या मनात येत होते. ‘त्यांचे दर्शन झाल्यावर माझे सर्वच प्रश्न आपोआपच सुटतील’, याची मला निश्चिती वाटत होती.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचे डोळे हिर्‍यांप्रमाणे चमकत असल्याचे दिसणे

परात्पर गुरुदेव दारातून अगदी सावकाश आत आले. मी डोळे उघडले. तेव्हा ते माझ्याकडेच पहात होते. बसण्याआधी ते १ – २ क्षण थांबले. तेव्हा मी त्यांच्या डोळ्यांकडे पाहिले. हिरे चमकावेत, तसे त्यांचे डोळे चमकत होते. मला त्यांच्या डोळ्यांचा पांढरा भाग दिसत नव्हता. ‘तिथे पारदर्शक आणि खोल खोल संथ पाणी आहे अन् त्यात दोन हिरे चमकत आहेत’, असे मला दिसले. माझे डोळे दीपले. एक क्षण मी बाजूला पाहिले आणि पुन्हा त्यांच्या डोळ्यांकडे पाहिले, तर पुन्हा तेच चमकणारे डोळे दिसले.

माझे विचार नाहीसे झाले. त्यांनी मला काहीतरी विचारले. मला काही ऐकायला आले नाही आणि कळलेही नाही. नंतर मी त्यांना माझ्या मनातील प्रश्न विचारले. ते चमकणारे डोळे मी पुनःपुन्हा अनुभवत आहे आणि मला अतिशय आनंद वाटत आहे.’

– श्रीमती ज्योती राणे, देहली

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक