साधकांना सूचना !
श्री गणेशचतुर्थीनिमित्त एप्रिलपासून श्री गणेशमूर्ती बनवण्याची प्रक्रिया मूर्तीकार चालू करतात. मूर्तीकारांनी सात्त्विक आणि शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती बनवावी, या उद्देशाने मूर्तीकारांचे प्रबोधन करणारे, तसेच शास्त्रानुसार असलेल्या श्री गणेशमूर्तीची मापे असणारे ‘ए ४’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक ‘सनातन संस्थे’ने बनवले आहे. आपल्या जिल्ह्यांतील मूर्तीकारांच्या भेटी घेऊन त्यांचे सात्त्विक श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी या पत्रकाचा परिणामकारकपणे वापर होऊ शकतो. हे हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.