
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर), ८ फेब्रुवारी (वार्ता.) – प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी १२५ वर्षांपूर्वी चालू केलेल्या कृष्णावेणीमातेचा उत्सव भावपूर्ण वातावरणात ७ फेब्रुवारी या दिवशी प्रारंभ झाला. हा उत्सव १० दिवस चालणार आहे. ७ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ५ वाजता मूर्तीचे आसन आणि किरीट सवाद्य मिरवणुकीने मानकरी जनार्दन कागलकर यांच्या घरामध्ये आणले. तेथे मूर्तीची पूजा करून सकाळी ६ वाजता मिरवणुकीने मूर्ती मुख्य मंदिरात नेण्यात आली.
मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीच्या वतीने आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या, तसेच सुवासिनींनी औक्षण केले. मुख्य मंदिरात मूर्ती आणल्यानंतर टेंबेस्वामी महाराजांच्या मठाजवळ उपस्थितांनी ‘घोराष्टकस्तोत्र’ म्हटले. यानंतर मूर्ती मंदिराच्या उत्तरेकडे उभ्या केलेल्या भव्य मंडपात नेण्यात आली. येथे मूर्तीची षोडशोपचार पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सवकाळात १० दिवस भजन-कीर्तन-प्रवचन, असे कार्यक्रम होणार आहेत.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा