
यवतमाळ, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – शहरापासून जवळच असलेल्या भांबराजा येथील शिवसेनेचे माजी सरपंच, तसेच यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे यांच्यावर ३ फेब्रुवारी या दिवशी गोळ्या झाडून नंतर कुर्हाडीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली, तर मृतक सुनीलच्या पत्नी सरपंच अनुप्रिया यांनाही मारहाणीत कुर्हाड पायाला लागल्याने त्या घायाळ झाल्या, तर मुलगा रुद्र या वेळी पळाल्यामुळे त्याचा जीव वाचला. या घटनमुळे शिवसैनिकांनी प्रचंड रोष व्यक्त करून गावातून जाणार्या नागपूर-तुळजापूर महामार्गावर रास्ता बंद आंदोलन केले.
या प्रकरणी गावातील ४ जणांना अटक करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकाराच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही हत्या पूर्ववैमनस्यातून केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी केला आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न