सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !
१. साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना विधीविषयक (कायदेविषयक) काही समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी समाजातील अधिवक्त्यांकडे जावे लागणे
‘साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना काही कारणाने विधीविषयक (कायदेविषयक) न्यायालयीन समस्या निर्माण होतात; पण त्यांची हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ किंवा सनातनचे साधक अधिवक्ते यांच्याशी जवळीक नसल्याने ते आपले न्यायालयीन दावे (खटले) साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना न देता किंवा त्यांचा सल्ला न घेता समाजातील अन्य अधिवक्त्यांकडे सोपवतात.
२. समाजातील अधिवक्त्यांचे शुल्क न परवडणारे असणे आणि समाधानकारक सेवा न मिळणे
साधक किंवा धर्मप्रेमींना अन्य अधिवक्त्यांचे शुल्क न देणे परवडत नाही अथवा त्यांना समाधानकारक सेवा मिळत नाही. यामध्ये साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा वेळ आणि ऊर्जा यांचा विनाकारण अपव्यय होतो.
३. ‘सनातनच्या साधकांनी हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक किंवा सनातनचे अधिवक्ते यांच्याशी जवळीक करणे’, ही काळाची आवश्यकता असणे
‘सनातनच्या साधकांनी हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ किंवा सनातनचे साधक अधिवक्ते यांच्याशी जवळीक केली नाही, तर समाजातील इतर लोकांशी आपण जवळीक कशी साधणार ?’, असा प्रश्न निर्माण होतो. ‘सनातनच्या साधकांनी हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक आणि सनातनचे साधक अधिवक्ते यांच्याशी जवळीक करणे’, ही काळाची आवश्यकता आहे.
– अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२३.१२.२०२१)